NOTE FROM A TEACHER TO A STUDENT (TEACHER'S DAY SPECIAL)
माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज शिक्षकदिन. खऱ्या अर्थानं साजरा करण्यापेक्षा साजिरा करण्याचा हा दिवस. पण आजच्या एकविसाव्या शतकात एका गुरूनं विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांचा मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या होण्याचा प्रयत्न करावा जो मी आज पर्यंत करत आलोय. खरं सांगू का तुम्ही आहात ना म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे. तुमच्या आयुष्यात गुरु होता नाही आलं तरी चालेल पण तुमच्या आयुष्याच्या प्रवासात वाट दाखवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. खरं तर तुम्ही दिलेल्या "मास्तर" , "ध्यापक" असो वा "सर" या पदव्या मला इतक्या प्रिय वाटतात ना की हा मला माझ्या आयुष्यात मिळालेला फार मोठा पुरस्कार वाटतो. गुरूनं खरं तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला अज्ञानरूपी अंधार दूर करावा पण तुमच्या सर्वांकडून मी इतकं काही शिकलोय ना की कुठं तरी माझ्याच आयुष्य उजळून निघालंय तुमच्यामुळे. माझ्यात झालेला हा बदल खरंच सुखावणारा आहे आणि याच संपूर्ण श्रेय फक्त तुम्हाला आहे. माझ्यातल्या गुरु होण्याच्या प्रवासातले तुम्ही सर्वच सोबती. खूप छान वाटतं माहितीये का जेव्हा तुम्हाला तुमची वाट सापडते ... तुमचा आनंद ...