NOTE FROM A TEACHER TO A STUDENT (TEACHER'S DAY SPECIAL)
आज शिक्षकदिन. खऱ्या अर्थानं साजरा करण्यापेक्षा साजिरा करण्याचा हा दिवस. पण आजच्या एकविसाव्या शतकात एका गुरूनं विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांचा मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या होण्याचा प्रयत्न करावा जो मी आज पर्यंत करत आलोय. खरं सांगू का तुम्ही आहात ना म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे. तुमच्या आयुष्यात गुरु होता नाही आलं तरी चालेल पण तुमच्या आयुष्याच्या प्रवासात वाट दाखवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. खरं तर तुम्ही दिलेल्या "मास्तर" , "ध्यापक" असो वा "सर" या पदव्या मला इतक्या प्रिय वाटतात ना की हा मला माझ्या आयुष्यात मिळालेला फार मोठा पुरस्कार वाटतो. गुरूनं खरं तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला अज्ञानरूपी अंधार दूर करावा पण तुमच्या सर्वांकडून मी इतकं काही शिकलोय ना की कुठं तरी माझ्याच आयुष्य उजळून निघालंय तुमच्यामुळे. माझ्यात झालेला हा बदल खरंच सुखावणारा आहे आणि याच संपूर्ण श्रेय फक्त तुम्हाला आहे. माझ्यातल्या गुरु होण्याच्या प्रवासातले तुम्ही सर्वच सोबती. खूप छान वाटतं माहितीये का जेव्हा तुम्हाला तुमची वाट सापडते ... तुमचा आनंद , तुम्हाला मिळालेलं यश कुठंतरी मला सुद्धा समृद्ध करत असत, मनोमन सुखावत असतं. तुम्ही जेव्हा विश्वासाने एखादी गोष्ट मला सांगता अथवा विचारता ना तेव्हा माझीच जबाबदारी फार जास्त वाढते तुमच्या त्या विश्वासाला खरं उतरण्याची. अजून फार मोठा प्रवास बाकी आहे आयुष्यात. खूप शिकायचंय आणि माझ्याजवळ जेवढं काही आहे ना तेवढं सगळं अगदी मुक्त हस्ताने तुमच्या साठी उधळून द्यायचंय. तुमच्यातल्या सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या जिज्ञासेला नेहमी जिवंत ठेवा. तुमची ज्ञानरूपी ज्योत कायम तेवत राहो आणि तुमचं आयुष्य उजळून निघो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. माझ्यातला शिक्षक नेहमीच जागा ठेवा. आशीर्वाद देण्याइतका मी नक्कीच मोठा नाही मित्रांनो. पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा. तुमची कीर्ती सर्वदूर पसरू देत. माझी जिथे कुठे गरज लागेल तिथे असेलच मी तुम्हाला वाट दाखवण्यासाठी. अगदी निर्धास्त या. विसावा घेण्यासाठी. आणि उंच झेप घ्या. शेवटी एकच... "Stay Hungry ... Stay Foolish..."
मनःपूर्वक शुभेच्छा !!!
मनःपूर्वक शुभेच्छा !!!
अनिकेत जोशी
(Software Engineering, Passionate Teacher and Theater Artist)
Comments
Post a Comment