रंगात रंगुनी साऱ्या....
कधी कधी आपल्याच स्वभावाचे नवीन कंगोरे आपल्याला नव्यानेच कळतात...फुलाची एक एक पाकळी अलगद उमलत जावी तसा एक एक कंगोरा आपल्यासमोर येतो.. नवल वाटतं ते आपल्यालाच नकळतपणे पुन्हा एकदा ओळखताना. म्हणजे पहा ना मुळात आपलं आयुष्य हे विविध रंगांनी तयार झालेलं असतं काही माणसं , काही क्षण मात्र आयुष्यात अगदी अचानक पणे येतात आणि आपल्याही नकळत या रंगांमध्ये सामावतात ... समरस होऊन आपलंच चित्र आपल्याला नव्याने दिसू लागतं.. ओठांवर एक हसू येतं ते हे पाहून की खरंच आपण असेही आहोत... स्वतःची नव्याने झालेली ओळख पाहून मनोमन सुखावणारे आपण पाहताना समोरच्या च्या चेहऱ्यावरचं कुतूहल फार समाधान देतं... आपणच आपल्याशी समरस होण्याची भावना , पुन्हा स्वतःच स्वतःला सापडल्याची भावना अतिशय सुखावह असते... अतिशय वैविध्यपूर्ण रंगांनी आपलं आयुष्य न्हाऊन निघालेलं असताना सुद्धा कुठंतरी एक विशिष्ठ रंग मात्र त्यातही वेगळा जाणवतो तोच रंग या बाकीच्या रंगाचं अस्तित्व ठेवून सुद्धा आपलं एक वेगळं अस्तित्व टिकवतो आणि आपल्यातलेच आपण पुन्हा बहारदार होतो आणि मग पुन्हा मनात गीत गुणगुणांवस वाटतं... रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा
अनिकेत जोशी
Nice post, Aniket. Keep it up. All the best.
ReplyDeleteNice one sir
ReplyDeleteखूप छान लिहिलेय !!!
ReplyDeleteखूपच छान...👌
ReplyDeleteNice keep it on. Keep sending......
ReplyDeleteVery nice👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteमस्तच रे एकदम..
ReplyDeleteKhuup chaan!!
ReplyDeleteNice lines ......
ReplyDeletecreative
ReplyDeleteNice lines
ReplyDelete