ट्रेकिंग म्हणजे नक्की काय?

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो होतो आणि एकदा असाच आजी सोबत बोलत बसलो होतो. तर आजी ने सहज विचारला की " काय रे, हे ट्रेकिंग म्हणजे नक्की काय?". मी काही उत्तर देणार तेवढ्यात आणखी २-३ प्रश्नांचा मारा तिने केला, " जेव्हा बघावा तेव्हा आपला डोंगरांनी भटकायला गेलेला असतोस? काय मिळतं तुला? शनिवार- रविवार सुट्टी असते, माणसाने जरा घरी रहावा, थोडा आराम करावा." असे वाक्य बऱ्याचदा ऐकायला मिळतात मला आणि मी ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो. कारण प्रत्येकाला समजावून उपयोग नाही पण समजणारे समजतात.

   तर मग ट्रेकिंग म्हणजे नक्की काय?  
ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगर चढणं आणि उतरणं का? नाही. ट्रेकिंग म्हणजे मौज मजे साठी असलेली सहल का? नाही. ट्रेकिंग म्हणजे फक्त चालने का? नाही. ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगरावर जाऊन सेल्फी काढणे का?नाही. 
   ट्रेकिंग म्हणजे आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून, स्वतः साठी काढलेले थोडा वेळ. ट्रेकिंग म्हणजे आपला इतिहास जाणून घेण्याचा एक प्रयत्न. ट्रेकिंग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन घेतलेला सुखाचा एक श्वास. माझ्यासाठी ट्रेकिंग म्हणजेच मेडिटेशन.
   ट्रेकिंग नंतर मिळणारा आनंद काय असतो ते एक ट्रेकरच समजू शकतो. सोमवारी कॉलेज/ऑफिस ला किती ही थकलेला असला तरी जायचे हे ठरवून शनिवार - रविवार ट्रेक करायची मज्जा वेगळीच. कारण आयुष्य शिस्तबद्ध राहून कसे जगावे हे ट्रेकिंग मुळे शिकायला मिळते. बाकी आपल्या सह्याद्रीतील दऱ्या, धबधबे, गडकिल्ले यांचे वेड लावणारे सौंदर्य वेगळेच.
  तर थोडक्यात सांगायचे झाले तर माझ्यासाठी ट्रेकिंग ही माझी जीवनशैली आहे.

धन्यवाद.
                                    
        

                                                                                                               गणेश दुस्मान
                                                                                              (Instagram:@guy.with.a.backpack)

Comments